‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात फ्लर्ट करण्यात हुशार!
By
Harshada Bhirvandekar
May 21, 2024
Hindustan Times
Marathi
अंकज्योतिषानुसार, कोणत्याही महिन्याच्या ६,१५ किंवा २४ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक ६ असतो.
मुलांक ६ वर शुक्र ग्रहाचं शासन आहे. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य आणि एकता प्रदान करतो.
६ मुलांक असणारे लोक नैसर्गिकरीत्या सर्जनशील, हुशार, जबाबदार असतात आणि लोकांशी सहज मैत्री करतात.
६ मुलांकाचे लोक केवळ स्वतःचीच नव्हे, तर इतरांची काळजी घेण्यातही निष्णात असतात.
स्वभावाने सर्जनशील आणि कलात्मक असल्याने या लोकांना प्रत्येक सुंदर गोष्ट आवडते.
इतकेच नाही तर, या लोकांमध्ये जीवनात चांगल्या गोष्टींवर उदारपणे खर्च करण्याची प्रवृत्ती असते.
या लोकांना जीवनात अधिक संतुलित असण्याची आवश्यकता असते. कारण हे लोक त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांवर अधिक अवलंबून असतात.
एखादी गोष्ट समस्या सोडवण्यात ते पूर्णपणे सक्षम असूनही, ते स्वतःहून सोडवू शकत नाहीत.
या मुलांकाच्या लोकांना फ्लर्ट करायला आवडते. याशिवाय लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा