‘या’ मुलांकाच्या लोकांवर असते सूर्यदेवाची खास कृपा!

By Harshada Bhirvandekar
Jun 25, 2024

Hindustan Times
Marathi

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक एक असतो.

ज्योतिषशास्त्रानुसार मुलांक १च्या लोकांचा स्वामी सूर्य आहे, जो शक्तीचे प्रतीक मानला जातो. 

मुलांक १ असलेले लोक त्यांच्या दृढ निश्चय आणि नेतृत्व क्षमतेसाठी ओळखले जातात.  

मुलांक १ असणारे लोक खूप प्रामाणिक असतात. सूर्याच्या कृपेने हे लोक आयुष्यात खूप प्रगती करतात.  

या मुलांकाचे लोक स्वाभिमानी, अतिशय महत्त्वकांक्षी, आकर्षक, सुंदर आणि आपले काम करण्यात कुशल असतात.

मुलांक १ असलेले लोक दूरदृष्टीचे असतात. त्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय बहुतांशी योग्यच ठरतात.  

मुलांक १ असणारे लोक निडर, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात. ते जीवनात येणाऱ्या समस्यांना घाबरत नाहीत.

मुलांक १ असलेले लोक स्वतःला नेहमी पहिलं प्राधान्य देतात. त्यांचा हा गुण त्यांना जीवनात यशस्वी बनवतो.

मुलांक १ असलेले लोक आयुष्यात खूप पैसा कमवतात, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली राहते.

पायल मलिक अरमानला घटस्फोट देणार?