अशी कामगिरी करणारा अश्विन एकटाच!

By Rohit Bibhishan Jetnavare
Sep 19, 2024

Hindustan Times
Marathi

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून (१९ सप्टेंबर) प्रारंभ झाला.

मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे.

या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमूल हसन शांतो याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

यानंतर भारताची सुरुवात खराब झाली. भारताचे १४४ धावांत ६ फलंदाज बाद झाले होते, त्यानंतर रविंद्र जडेजा आणि अश्विनने डाव सावरला.

अश्विनने शानदार नाबाद शतक केले तर जडेजा ८६ धावांवर नाबाद आहे.

अश्विन जगातला एकमेव खेळाडू बनला आहे, ज्याने कसोटीत ५०० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. तसेच, २० वेळा ५० प्लस धावा केल्या आहेत.

अश्विनचे कसोटीत ५१६ विकेट्स आहेत. तसेच, त्याने कसोटीत १४ अर्धशतकं आणि ६ शतके केली आहेत. 

या यादीत इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ६०४ विकेट्स घेतल्या आहेत आणि १४ वेळा ५० प्लस धावा केल्या आहेत.

मखाना खाण्याचे काय आहेत फायदे?