पीव्ही सिंधू किती शिकलीय?
By
Rohit Bibhishan Jetnavare
Dec 26, 2024
Hindustan Times
Marathi
भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने २२ डिसेंबर रोजी व्यंकट दत्ता साईसोबत लग्न केले.
दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सिंधूचे पती व्यंकट दत्ता हे साई पॅसिडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत.
बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने हैदराबादच्या सेंट ॲन्स कॉलेज फॉर वुमनमधून बीकॉम आणि एमबीए केले आहे.
चेन्नई वेल्स विद्यापीठाने तिला मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविले आहे.
सिंधूने तिचे शालेय शिक्षण हैदराबादच्या ऑक्सिलियम हायस्कूलमधून केले.
व्यंकट दत्ता साई हे वरिष्ठ आयटी व्यावसायिक आणि पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत.
व्यंकट दत्ता साई हे एक यशस्वी उद्योजक आहेत. फायनान्स, डेटा सायन्स आणि ॲसेट मॅनेजमेंट या क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
व्यंकट दत्ता साई यांनी फाउंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशनमधून लिबरल आर्ट्स अँड सायन्सेस/लिबरल स्टडीजमध्ये डिप्लोमा केला आहे.
सोबतच त्यांनी फ्लेम युनिव्हर्सिटीमधून बीबीए (अकाउंटिंग अँड फायनान्स) केले आहे.
तसेच, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बंगलोर येथून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.
झणझणीत मिरचीचा ठेचा कसा बनवायचा?
पुढील स्टोरी क्लिक करा