गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!

Unsplash

By Ashwjeet Jagtap
Feb 10, 2025

Hindustan Times
Marathi

गरोदर महिलांनी खाल्लेल्या अन्नाचा बाळाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती असते.

Unsplash

गरोदर महिलांमध्ये बद्धकोष्ठता, आम्लपित्त, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या जाणवतात. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने भविष्यात आरोग्याशी संबंधित उद्भवणाऱ्या समस्यांना रोखता येते.

Unsplash

भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर, झिंक, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन ए, बी, कॅल्शियम आणि फॅटी अॅसिड चे प्रमाण जास्त असते.

Unsplash

भोपळ्याच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्ठताही कमी होते.

Unsplash

भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले कॅल्शियम आणि फॅटी अॅसिड हाडे मजबूत बनवतात. ते बाळाच्या वाढीसाठीही उपयुक्त असतात.

Unsplash

भोपळ्याच्या बिया खाणाऱ्या स्त्रिया स्तनाच्या कर्करोगापासून स्वत:चा बचाव करू शकतात. ते उच्च रक्तदाब आणि साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात.

Unsplash

भोपळ्याच्या बियाण्यातील झिंक केसगळती रोखण्यास मदत करते. पण जास्त खाऊ नका. तसेच खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Unsplash

फळांचा आहार 

झटपट वजन कमी करण्यासाठी हे फळं खा!

PEXELS