घरातील देवपूजेदरम्यान करु नका या चुका, लागू शकतो दोष!

By Priyanka Chetan Mali
Dec 27, 2024

Hindustan Times
Marathi

घरी आपण रोज देवपूजा करतो. नियमित पूजेशी संबधित अनेक गोष्टी ज्योतिष शास्त्रात सांगितल्या आहेत.

नियमित देवपूजा करतांना अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण पाळल्या पाहिजेत.असे मानले जाते की, या नियमांचे पालन न केल्याने दोष निर्माण होतात.

चला तर मग जाणून घेऊया नियमित पूजा करतांना कोणत्या चूका टाळाव्यात.

पूजा सुरू करण्यापूर्वी घरातील मंदिराची दररोज स्वच्छता करावी. कारण स्वच्छतेत देवी लक्ष्मीचा वास असतो.

त्याचबरोबर मंदिरातील जुनी फुले काढून मंदिर नव्या फुलांनी सजवावे.

नियमित पूजा सुरू करण्यापूर्वी आसनावर बसा. तसेच शास्त्रानुसार उभे राहून कधीही पूजा करू नये.

शास्त्रात आसन हे देवत्व प्रदान करणारे आहे असे सांगितले आहे. बसून पूजा करतांना आसन घेणे महत्वाचे आहे.

पूजा करतांना मंत्रांचा जप करावा. असे मानले जाते की, जेव्हा आपण दररोज एखाद्या मंत्राचा जप करतो तेव्हा तो मंत्र सिद्ध होऊ लागतो.

शास्त्रानुसार जेव्हा एखादा मंत्र सिध्द होतो तेव्हा अनेक फायदे आणि पुण्य प्राप्त होतात.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!