अशी मी मदन मंजिरी... प्राजक्ता माळीच्या सुबक अदा!
By
Harshada Bhirvandekar
Jan 15, 2025
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री प्राजक्ता माळी 'फुलवंती' या चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.
'फुलवंती' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आहे.
प्राजक्ता माळी हिच्या 'फुलवंती' या चित्रपटाला रिलीज होऊन आता तीन महीने झाले आहेत.
दरम्यान, प्राजक्ताने आता 'फुलवंती'मधील काही फोटो पोस्ट केले आहेत.
प्राजक्ताने शेअर केलेले हे फोटो चित्रपटाच्या शेवटच्या गाण्यातील नृत्याचे आहेत.
या फोटोंना तिने ‘दरवळते मी कस्तुरी…हा दरवळ आयुष्यभर राहणार…', असं फोटो कॅप्शन दिलं आहे.
तिच्या या सुंदर फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
'हे सौंदर्य अस्सल आहे. प्राजक्ताजी तुम्ही अप्रतिम आहात', अशा कमेंट्स चाहते या फोटोंवर करत आहेत.
प्राजक्ता माळीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
माघ पौर्णिमेला या ठिकाणी दिवे लावल्यास प्रसन्न होईल देवी लक्ष्मी
पुढील स्टोरी क्लिक करा