हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्त्व आहे आणि त्यासाठी अनेक नियम देखील सांगण्यात आले आहेत.
असाच एक नियम म्हणजे आठवड्यातील कोणत्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा करायची आणि कोणते फुल अर्पण करायचे.
कोणत्या देवतेला कोणते फुल अर्पण करावे हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया...
देवी लक्ष्मीला कमळ आणि गुलाबाची फुले अर्पण करू शकता. याशिवाय पिवळ्या किंवा लाल रंगाचे कोणते फूल देवीला अर्पण करू शकता.
भगवान विष्णूला तुळस अर्पण करा. यासोबतच मोगरा, कमळ, जुई, मालती, चाफा आणि केतकी ही फुले ही विष्णूच्या पूजेत वापरता येतात.
दुर्गा मातेच्या पूजेत जास्वंद, लाल गुलाब, पांढरं कमळ आणि गुलाबाची फुले अर्पण केली जाऊ शकतात.
माता सरस्वतीच्या पूजेत पांढरी फुले अर्पण करावीत. त्यासोबतच माता सरस्वतीला पिवळ्या रंगाची झेंडूची फुले अर्पण केली जातात.
भोलेनाथाची पूजा करताना धोत्र्याची फुलं, नागकेसर अर्पण करतात. यासोबतच कणेर आणि आक ही फुलं देखील भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. त्यासोबतच भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करावे.
भगवान हनुमनाची पूजा करताना लाल गुलाब आणि केशरी झेंडूच्या फुलांचा वापर करावा.
गणपती बाप्पाची पूजा करताना त्याच्या पूजेत जास्वंद, मोगरा आणि पारिजातकाची फुलं घ्यावी.