संध्याकाळी नक्की किती वाजता करावी देवपूजा?

By Harshada Bhirvandekar
May 22, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. सकाळी आणि संध्याकाळी पूजा करण्याचे काही विशेष नियम असतात. 

सकाळच्या पूजेचा वेळ तर बऱ्याच लोकांना माहीत असतो. मात्र संध्याकाळी किती वाजता पूजा करावी याबद्दल संभ्रम असतो. 

अशावेळी संध्याकाळी पूजा करताना बरेच लोक चुका करतात. यामुळे घरात आर्थिक संकट देखील येऊ शकते. 

आता प्रश्न असा आहे की, संध्याकाळी पूजा करण्याची नक्की कुठली वेळ असावी आणि कुठल्या चुका करू नयेत? चला जाणून घेऊया...  

ज्योतिष्यचार्यांच्या मते संध्याकाळी सूर्यास्ताच्या एक तास आधीपासून ते सूर्यास्ताच्या एक तासनंतरपर्यंत पूजा करण्याचा योग्य वेळ आहे.  

धार्मिक मान्यतेनुसार संध्याकाळी पूजा करत असताना शंख किंवा घंटी चुकूनही वाजवू नये. 

असं म्हणतात की, सूर्य अस्त झाल्यानंतर देवी देवता यांची आरामाची वेळ असते. अशावेळी शंख किंवा घंटी वाजवून तुम्ही त्यांच्या आरामात विघ्न आणता.  

शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी देवाची पूजा करताना फुलं वाहू नये. कारण संध्याकाळी फुल तोडणे अशुभ असते.

संध्याकाळच्या वेळी पूजा करताना तुळशीची पानं देखील वाहू नयेत. तिन्हीसांजेला तुळशीची पानं देखील तोडू नयेत.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान