शेतीशी संबधित व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार १८ लाखांचे अनुदान !
By Shrikant Ashok Londhe May 01, 2023
Hindustan Times Marathi
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘पीएम शेतकरी एफपीओ योजना’ सुरू करण्यात आली आहे.
या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार शेतकरी व शेती संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी १८ लाखांचे आर्थिक अनुदान उपलब्ध करते.
दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना बनवणे व त्यामध्ये सामील होणे आवश्यक आहे. या संघटनेत कमीत कमी ११ शेतकऱ्यांचा समावेश असणे आवश्यक आहे.
पीएम एफपीओ योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते.
या योजनेच्या माध्यमातून शेतकरी खते, बियाणे, केमिकल आणि कृषि यंत्र यासारखे आवश्यक कृषी साधने स्वस्त दरात खरेदी करू शकतात.
याबरोबरच शेतकरी कमी व्याज दराने बँकेतून कर्जही मिळवू शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइट (enam.gov.in) वर जाऊन अर्ज करू शकतात.
विद्यार्थ्यांनी आवर्जुन बघाव्या या नेटफ्लिक्स सिरीज