‘अशा’ लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर!

By Harshada Bhirvandekar
Oct 08, 2024

Hindustan Times
Marathi

कच्चं पनीर सगळेच आवडीने खातात. तर, याची भाजी देखील खूप चविष्ट बनते.

पनीरमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, झिंक, अँटीऑक्सिडंट असे अनेक पोषक घटक असतात.

पनीर खाण्याचे अनेक फायदे आहेत, तसे तोटे देखील आहेत. यामुळे काही लोकांनी चुकूनही पनीर खाऊ नये.

चला तर, जाणून घेऊया कुणी पनीर खाऊ नये आणि याचे काय दुष्परिणाम आहेत.

पनीर दुधापासून बनल्यामुळे त्यात लॅक्टोस जास्त असते. तुम्हाला पोटाचा आजार असेल, तर पनीर खाणे टाळा.

जर तुम्हाला हृदयासबंधित आजार असेल, तर पनीर खाऊ नका. यामुळे कोलेस्ट्रोल वाढू शकते.

तुमच्या शरीरावर गाठी येत असतील, तर पनीर खाणे टाळा. यातील प्रोटीनमुळे युरीक अ‍ॅसिड वाढते.

पनीरमध्ये कॅलरी आणि फॅट्सअधिक असतात, जर तुम्ही लठ्ठपणा कमी करायचा प्रयत्न करत असाल तर पनीर टाळा.

मूत्राशयासबंधित आजारात पनीर सेवन टाळावे. पनीरमधील प्रोटीन किडनीवर दबाव आणते.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान