वांगी हे बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. त्यात भरपूर पोषक असतात. अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असलेली ही भाजी शरीराला अनेक हानीपासून वाचवते.
pixabay
कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या दीर्घकालीन आजारांपासून बचाव करण्याची ताकद त्यात आहे.
pixabay
तथापि, काही आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी वांगी खाणे टाळावे.
pixabay
पचनाच्या समस्या असल्यास वांगी खाणे टाळा. कारण वांग्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते आणि गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.
pixabay
त्वचेला जळजळ आणि खाज येत असल्यास वांगी टाळावीत. स्किन एलर्जी असल्यास टाळा. यामुळे समस्येची तीव्रता वाढू शकते.
pixabay
जर तुम्ही नैराश्य किंवा चिंतेसाठी अँटीडिप्रेसेंट्स घेत असाल तर वांगी खाऊ नका. वांग्यामुळे तुमची तणावाची पातळी वाढू शकते. त्यामुळे गोळीची क्षमताही कमी होण्याची शक्यता असते.
pixabay
किडनी स्टोन असणाऱ्यांनी वांगी टाळावीत. वांग्यातील ऑक्सलेटमुळे तुमची स्टोनची समस्या आणखी वाढू शकते.