‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांना आवडतो एकटेपणा!

By Harshada Bhirvandekar
Apr 30, 2024

Hindustan Times
Marathi

अंकशास्त्रात प्रत्येक मूळ संख्येला विशेष महत्त्व असते. यामध्ये मूलांक ८ असलेल्या लोकांना खूप खास मानले जाते.

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला होतो, त्यांच्या मुलांक ८ असतो. जाणून घेऊया अशा लोकांबद्दल खास गोष्टी...  

८ मुलांक असलेले लोक स्वभावाने खूप अंतर्मुख असतात. या लोकांना गजबजाटापासून दूर एकांतात राहायला आवडते.  

यामुळे अशा लोकांना शांतता जास्त प्रिय आहे. या मुलांकाचे लोक त्यांचं आयुष्य एकाकीपणात घालवतात. 

८ मुलांक असणारे लोक त्यांच्या ध्येय आणि कार्यपूर्तीसाठी समर्पित असतात. हे लोक कष्ट करायला कधीच घाबरत नाहीत.  

मुलांक ८ असलेल्या लोकांवर शनीची कृपा असून, ते देखील शनी प्रमाणेच नेहमी योग्य गोष्टींना समर्थन देतात.  

या मुलांकाचे लोक जबाबदारी घेण्यास कधीही घाबरत नाहीत. तसेच, दृढनिश्चय आणि शिस्तबद्ध असतात.

कोणतेही काम करताना ते पूर्णपणे झोकून देऊन आणि मेहनतीने करतात. हे लोक त्यांच्या वेळेचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे करतात.  

एखादी गोष्ट त्यांनी करायची ठरवली, तर ती पूर्ण साध्य केल्यानंतरच ते थांबतात.

हार्दिक पांड्या-नताशाची पहिली भेट कुठे झाली होती?