पौष महिन्यात करा हे ७ शुभ काम
By
Priyanka Chetan Mali
Jan 03, 2025
Hindustan Times
Marathi
हिंदू पंचांगानुसार पौष हा १०वा महिना आहे, या महिन्याचे खास महत्व आहे.
या महिन्यात सूर्यदेवाची पूजा करण्याचे विशेष महत्व सांगितले आहे. या दरम्यान काही खास कार्य करावे जे शुभ मानले जातात.
पौष महिन्यात भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा अभिषेक करणे या शुभ कार्यातले एक कार्य आहे.
दक्षिणावर्ती शंखात केसर मिश्रित दूध भरावे आणि विष्णू-लक्ष्मीच्या प्रतीमेवर अभिषेक करा. तसेच, ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा.
या महिन्यात श्रीमद् भगवत् गीतेचे पठण करणेही शुभ मानले जाते. ग्रंथ वाचनासह यातील शिकवणीचा जीवनात वापर करावा असा संकल्प घ्या.
गीतासह भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची कथा ऐकावी किंवा वाचावी. संताचे प्रवचन, भजन, किर्तनही ऐकू शकतात.
पौष महिन्यात धन-धान्य, कपडे, चप्पल, अन्नदान केले पाहिजे. तसेच गुड आणि काळे तीळचे दानही फार शुभ फळदायी ठरते.
पौष महिन्यात गंगा, यमुना सारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचीही परंपरा आहे.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
झणझणीत मिरचीचा ठेचा कसा बनवायचा?
पुढील स्टोरी क्लिक करा