ना डाएट ना एक्सरसाइज, पतीपासून दूर राहून अभिनेत्रीनं कमी केलं वजन
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Nov 12, 2024
Hindustan Times
Marathi
प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल व अभिनेत्री सहीफा जब्बार हिने वजन कमी करण्याची अशी एक पद्धत सांगितली, जे ऐकून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
एका मुलाखतीत सहीफाने सांगितले की, तिचा पती परदेशात राहतो. त्यामुळे अनेक लोक तिला विचारतात कि, एकटी कशी राहतेस.
अभिनेत्रीने म्हटले की, लोकांना मी सांगते, घरी जाऊन मी अंघोळ करते, जेवते व झोपून जाते. झोपल्याने मला खूप शांती मिळते.
सहीफा जब्बारने म्हटले की, ती जिम करत नाही, तिला जिमची खूप भीती वाटते.
अभिनेत्रीने म्हटले की, ती जिममध्ये जाते, ट्रेनरला पैसे देते मात्र दोन दिवसातच तिला जिमला जाण्याचा कंटाळा येतो.
होस्टने तिला विचारले की, ती स्वत:ला इतके फिट कसे ठेवते, त्यावर तिने म्हटले की, मी दु:ख सहन करून डिप्रेशनमध्ये स्वत:ला फिट ठेवले आहे.
तिने म्हटले की, तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर पतीला दूर कोठेतरी पाठवा.
सहीफाने म्हटले की, तुम्हाला माहिती असते की, तुम्ही इतक्या दूर जाऊ शकत नाही, व पती कॅनडातून परत येणार नाही, अशावेळी डिप्रेशन येणारच.
अभिनेत्रीने म्हटले की, पती वाईट असेल तर महिला म्हणातात चांगले झाले दूर गेला. मात्र जर पती चांगला असेल व दूर गेला असेल तर खूप कठीण होते.
-पुरुष उजव्या तर महिला डाव्या हातात का बांधतात रक्षासूत्र?
पुढील स्टोरी क्लिक करा