पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर आणि ‘गणपत्ती बाप्पा’

Instagram

By Shrikant Ashok Londhe
May 22, 2023

Hindustan Times
Marathi

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले होते, जे आता व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये २६ वर्षीय हानिया गणेश मूर्तीसमोर वेगवेगळ्या पोज देत असताना दिसत आहे.

हानियाच्या भारतीय फॅन्सना हे फोटो खूप आवडले आहेत. काही युजर्संनी लिहिले आहे की, तिच्याप्रती त्यांचा आदर असून वाढला आहे.

मात्र हानियाचे हे फोटो तिच्या पाकिस्तानी फॅन्सना आवडले नाहीत. लोक कमेंट करून तिला ट्रोल करत आहेत. पाक फॅन्स म्हणत आहेत की, अल्लाह तुला सदबुद्धी देवो.

हानिया बिनदास्त स्वभावाची असून ती कशाचीही पर्वा न करता आपले आयुष्य खुशीने जगते.

हानियाच्या सोशल मीडिया पोस्टवरून समजते की, तिला भटकंती करणे खूप आवडते. ती संधी मिळताच बॅग भरून मित्र-मैत्रिणींबरोबर इन्जॉय करायला निघून जाते.

Instagram

हानिया सध्या पाकिस्तानी मालिका ‘मुझे प्यार हुआ था’ मध्ये काम करत आहे. यामध्ये वहाज अली सुद्धा लीड रोलमध्ये आहे.

हानियाची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. इंस्टाग्रामवर तिचे ७.७ मिलियन फॉलोअर्स आहेत.

हानियाने नाटू नाटू गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. तेव्हापासून ती भारतीत फेमस झाली आहे.तिचे पाकिस्तानबरोबरच भारतातही मोठी फॅट फॉलोईंग आहे.

Instagram

शहनाज गिलचा सिझलिंग लूक!

Photo: Shehnaaz Gill/Instagram