शाहीन आफ्रिदी बाप झाला

By Rohit Bibhishan Jetnavare
Aug 24, 2024

Hindustan Times
Marathi

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी रावळपिंडीत खेळवली जात आहे. 

या कसोटीदरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या घरातून गूड न्यूज आली आहे. 

शाहीन आफ्रिदीची पत्नी अंशा आफ्रिदीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या मुलाचे नाव अली यार ठेवण्यात आले आहे. 

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शाहीन आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदीचे लग्न झाले होते.

यानंतर आता शाहीन आफ्रिदी त्याच्या मुलाच्या जन्मामुळे पाकिस्तान-बांगलादेश कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. 

अंशा आफ्रिदी ही पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे. 

शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत ३० कसोटी, ५३ एकदिवसीय आणि ७० टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. 

शाहीन आफ्रिदीच्या नावावर कसोटीत ११३, वनडेत १०४ आणि टी-20 मध्ये ९६ विकेट्स आहेत.

केवळ आनंद नव्हे तर एवढे फायदे देतं नृत्य