मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposit) विशिष्ट रक्कम ठेवून दर महिन्याला उत्पन्न मिळवणं हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.
एफडीवर व्याज मर्यादित असलं तरी त्यात जोखीम अजिबात नसते. ठराविक रक्कम मिळणारच ही खात्री असते.
कॉर्पोरेट बाँड्स
महिन्याला किंवा वर्षाला निश्चित उत्पन्न मिळवण्यासाठी कॉर्पोरेट बाँड्स हा दुसरा एक पर्याय आहे.
कॉर्पोरेट बाँड्समधील गुंतवणुकीवर बँक एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. मात्र, या गुंतवणुकीत जोखीम असते. कंपनीच्या कामगिरीवर यावरील उत्पन्न अवलंबून असते.
मासिक भाडे
एखादं घर किंवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करून ते भाड्यानं देऊन त्यातून नियमित उत्पन्न मिळवता येतं. मात्र त्यासाठी तुमच्याकडं मालमत्ता खरेदीची ताकद हवी.
REITS
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट अर्थात, रीट्स हा आणखी एक नियमित उत्पन्नाचा पर्याय आहे. यातील गुंतवणुकीची पद्धत शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासारखीच असते.
या प्रकारात तुम्हाला प्रत्यक्ष मालमत्ता खरेदी करण्याची गरज नसते. तर, मालमत्ता खरेदी करून भाड्यानं देणाऱ्या ट्रस्टमध्ये गुंतवणूक करायची असते.
REIT
लाभांश
घसघशीत लाभांश देणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणं हा देखील नियमित उत्पन्नाचा एक पर्याय आहे.
कंपन्यांकडून मिळणाऱ्या लाभांशाची टक्केवारी फारच कमी असते. त्यामुळं अधिक लाभांशासाठी शेअरमध्ये मोठी गुंतवणूक करावी.
बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रेया बुगडे पोहोचली वर्षा बंगल्यावर