वनप्लसचा दीड लाखांचा फोन बाजारात, 'ही' आहे खासियत

By Ashwjeet Rajendra Jagtap
Aug 10, 2024

Hindustan Times
Marathi

वनप्लस कंपनीने फोल्डेबल स्मार्टफोनचे आणखी एक व्हेरियंट काही नवीन फीचर्ससह लॉन्च केले.

वनप्लस ओपन एपेक्स एडिशनमध्ये नवीन कलर व्हेरियंट, ग्रेटर स्टोरेज, सिक्युरिटी चिप आणि प्रायव्हसी मोड चा समावेश आहे.

हा स्मार्टफोन १६ जीबी रॅम आणि १ टीबी इंटरनल मेमरीच्या एका स्टोरेज व्हेरियंटसह सादर करण्यात आला आहे.

वनप्लस ओपन एपेक्स एडिशनमध्ये ६.३१ इंचाचा 2K एमोलेड कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे.

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे.

फोनमध्ये ४ हजार ८०५ एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे . 

१६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत १ लाख ४९ हजार ९९९ रुपये आहे. 

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik