वनप्लस १२ आरच्या किंमतीत घसरण!
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 26, 2024
Hindustan Times
Marathi
वनप्लस १३ आर लाँचिंगपूर्वी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने वनप्लस १२ आरच्या किंमतीत लक्षणीय कपात केली आहे.
वनप्लस १२ च्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे.
अॅमेझॉनवरून ग्राहकांना स्मार्टफोनवर ९ टक्के सूट देत केवळ ३८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.
या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक डिस्काउंट आणि एक्स्चेंज ऑफर देखील मिळत आहे.
आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डच्या व्यवहारावर ग्राहकांना अतिरिक्त ३००० डिस्काऊंट मिळत आहे.
बँक ऑफरव्यतिरिक्त ग्राहकांना एक्स्चेंज ऑफरसह वनप्लस १२ आर वर २२ हजार ८०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
वनप्लस १२ आरमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाचा 1.2K एमोलेड डिस्प्ले आहे.
वनप्लस 12 आर मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ५० एमपीचा मुख्य कॅमेरा, ८ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २ एमपी मॅक्रो लेन्स आहे.
या फोनमध्ये ५ हजार ५०० एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
वनप्लस १२ च्या ऑफरबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अॅमेझॉनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
तुपाने मालिश करण्याचे जबरदस्त फायदे!
पुढील स्टोरी क्लिक करा