२२ जानेवारीला घरी  राम ज्योती  कशी पेटवायची?  

By Rohit Bibhishan Jetnavare
Jan 18, 2024

Hindustan Times
Marathi

अयोध्येत २२ जानेवारीला श्री रामांची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या दिवशी पंतप्रधानांनी  राम ज्योती प्रज्वलित करण्यास सांगितले आहे.

राम ज्योती कोणत्या वेळी प्रज्वलित करायची? कशी प्रज्वलित करायची? राम ज्योती प्रज्वलित करताना मंत्र कोणता म्हणायचा?

श्री रामांची प्रतिष्ठापणा होताना नाही तर सायंकाळच्या समयी राम ज्योती प्रज्वलित करायची आहे.

 मातीच्या दिव्यात राम ज्योती पेटवावी कारण ती सर्व सामान्यांना सहज उपलब्ध आहे. पण इच्छा असल्यास धातूचा दिवा देखील वापरू शकता. 

राम ज्योती प्रज्वलित करण्यासाठी तीळ किंवा मोहरीचे तेल वापरावे. कुणाला तुपाचा दिवा लावायचा असेल तर अजूनच छान.

श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी किमान एक दिवा लावावा. तुम्ही ११ किंवा १०८ दिवेदेखील लावू शकता. पण ११ दिवे लावणे फारच अशुभ आहे.

राम ज्योती प्रज्वलित केल्यानंतर, त्या ११ पैकी ५ दिवे आपल्या पूजास्थानी ठेवा. उर्वरित ६ दिवे घराचे मुख्य प्रवेशद्वार, अंगण यासह महत्त्वाच्या ठिकाणी ठेवता येतील.

राम ज्योती प्रज्वलित करताना शुभम करोति कल्याणम, आरोग्य धन संपदम्, शत्रु बुद्धी विनाशाय, दीपम् ज्योति नमोस्तुते या मंत्राचा जप करा.   

बेली फॅट कमी करण्यास मदत करणारे ड्रिंक्स

freepik