होळीच्या अग्नीत अर्पण करा ‘या’ गोष्टी, गरिबी होईल दूर!
By
Harshada Bhirvandekar
Mar 21, 2024
Hindustan Times
Marathi
फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होलिका दहन अर्थात होळी केली जाते.
यावेळी २४ मार्चला होलिका दहन पार पडणार आहे. तर, २५ मार्चला धुळवड खेळली जाणार आहे.
होलिका दहनासाठी लाकूड आणि शेणाच्या गोवऱ्या वापरल्या जातात.
होलिका दहनाच्या वेळी अग्नीला काही विशेष वस्तू अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.
असे मानले जाते की, ‘या’ गोष्टी होळीच्या अग्नीला अर्पण केल्याने सुखसमृद्धी वाढते. चला तर, जाणून घेऊया अशाच गोष्टींबद्दल...
होळीच्या अग्नीत सुके खोबरे, सुपारी आणि खायचे अर्पण केल्याने, आर्थिक समस्या दूर होतात, असे मानले जाते.
होळीच्या अग्नीत जवसाचे पीठ अर्पण केल्याने घरातील कलह आणि वाद दूर होतात. तसेच, कौटुंबिक जीवन सुखी होते.
खायचे पान तुपात भिजवून, त्यावर बताशा ठेवून ते होळीच्या अग्नीत अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात.
होळीच्या अग्नीमध्ये दहा कडुलिंबाची पाने आणि कापूर अर्पण केल्यास आरोग्याशी संबंधित समस्यांपासून कायमस्वरूपी मुक्ती मिळते.
होळीच्या अग्नीत अक्षता अर्पण केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते व आर्थिक समस्या दूर होते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा