देवी लक्ष्मीला अर्पण करा ‘ही’ १ गोष्टी; उघडतील भाग्याचे दरवाजे!

By Harshada Bhirvandekar
May 27, 2024

Hindustan Times
Marathi

देवी लक्ष्मीची नित्य पूजा केल्याने आर्थिक संकट येत नाहीत आणि धन समृद्धीची कमतरता जाणवत नाही.  

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तिला तिच्या आवडत्या वस्तू अर्पण करू शकता.  

धार्मिक शास्त्रानुसार, धनाच्या देवीला म्हणजेच माता लक्ष्मीला धणे अर्पण केल्याने तिचा आशीर्वाद कायम राहतो.

यासोबतच देवी लक्ष्मीला धणे अर्पण केल्याने अनेक चमत्कारी फायदे देखील दिसून येतात. जाणून घेऊया...  

देवी लक्ष्मीला धणे अर्पण केल्याने घरात नेहमी सुख-समृद्धी येते. या उपायाने मातेचा आशीर्वाद सदैव राहतो.  

देवी लक्ष्मीच्या चरणी धणे अर्पण केल्यानंतर तिजोरीत किंवा ज्या ठिकाणी पैसा ठेवला आहे, त्या ठिकाणी लाल कपड्यात बांधून धणे ठेवा.  

यामुळे तिजोरी कधीही रिकामी होणार नाही आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.  

कर्जाचा बोजा वाढत असेल, तर देवी लक्ष्मीला धणे अर्पण करावे यामुळे तुमच्या डोक्यावरून कर्जाचे ओझे लवकर निघून जाईल.

रिंकू राजगुरुच्या वडिलांना कसा हवा जावई?