वर्ष २०२५ सुरू होणार आहे. अंकशास्त्रानुसार या मूलांकांच्या लोकांसाठी हे वर्ष खुप लाभदायक आणि शुभ ठरेल.
मूलांक ९ - वर्ष २०२५ च्या अंकांची बेरीज ९ आहे. अशा परिस्थितीत नवव्या क्रमांकाच्या लोकांसाठी हे वर्ष उत्तम असणार आहे. त्याचा अधिपती ग्रह मंगळ आहे.
९,१८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. मंगळाच्या प्रभावामुळे नोकरीपासुन व्यवसायापर्यंत सर्वच क्षेत्रात प्रगती होईल.
मूलांक ४ - मूलांक ४ असलेल्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष उत्तम ठरणार आहे. ज्यांचा जन्म ४,१३,२२ किंवा ३१ तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या ४ असेल.
मूलांक ४ हा राहूशी संबधित मानला जातो. वर्ष २०२५ मध्ये, या क्रमांकाच्या लोकांना संयम ठेवावा लागेल आणि त्यांना काही मोठ्या संधी मिळू शकतातू.
मूलांक ५ - ५,१४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या ५ असते. त्यांचा अधिपती ग्रह बुध आहे. २०२५ मध्ये या लोकांची त्यांच्या करियरमध्ये खूप प्रगती होईल.
मूलांक ६ - अंक ६ असलेल्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष चांगले राहील. ६,१५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.
मूलांक ६ चा स्वामी ग्रह शुक्र आहे. २०२५ मध्ये, हे लोक त्यांच्या ओळखीचे फायदे मिळवण्यात यशस्वी होतील.
मूलांक ८ - ८,१७ किंवा २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. त्यांचा स्वामी ग्रह शनी आहे. २०२५ मध्ये यांनाही भरपूर यश मिळेल.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
अमेरिकेत राष्ट्रपती रिटायर झाल्यावर काय काय सुविधा मिळतात ?