‘या’ मुलांकाच्या लोकांवर असते माता लक्ष्मीची कृपा!

By Harshada Bhirvandekar
Jul 08, 2024

Hindustan Times
Marathi

अंकशास्त्रात प्रत्येक संख्येला विशेष महत्त्व असते आणि मुलांक संख्येवर आधारित असतो. 

असे काही मुलांक आहेत, ज्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल... 

मुलांक १ वर्ष सूर्यग्रहाचे अधिपत्य आहे. सूर्य हा ग्रह आत्मविश्वास, नेतृत्व आणि यशाचे प्रतीक आहे.

देवी लक्ष्मी १ मुलांक असलेल्या लोकांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणावर प्रसन्न होते आणि त्यांना जीवनात यश संपत्ती आणि सन्मान प्रदान करते. 

मुलांक ६ असलेल्या लोकांवरही देवी लक्ष्मीची कृपा असते. हे लोक सर्जनशील कलात्मक आणि सौंदर्य प्रेमी आहेत.

यांच्यात इतरांना मदत करण्याची तीव्र भावना असते. त्यांच्या दयाळूपणाने आणि परोपकारी भावनेने देवी लक्ष्मी प्रभावित होते. 

मुलांक ८ असलेल्या लोकांवर शनी ग्रहाचे राज्य असते. मुलांक ८चे लोक मेहनती दृढनिश्चयी आणि जबाबदार असतात.  

त्यांच्याकडे दूरदृष्टी आणि कार्यक्षम व्यवस्थापनाची क्षमता देखील आहे. त्यांच्या मेहनती स्वभावावर आणि जिद्दीवर देवी लक्ष्मी प्रसन्न होते. 

९ या मुलांकावर मंगळ ग्रहाचे अधिपत्य आहे. त्यांच्या धैर्याने आणि शौर्याने देवी लक्ष्मी प्रभावित होते.

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?