हिना खानच नव्हे, ‘या’ अभिनेत्रींनीही दिलीय कर्करोगाशी झुंज!

By Harshada Bhirvandekar
Jun 28, 2024

Hindustan Times
Marathi

टीव्ही अभिनेत्री हिना खान हिने तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची बातमी शेअर केली आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

हिना खानच नव्हे तर, बॉलिवूड आणि टीव्ही विश्वात आजवर अनेक अभिनेत्रींनी कर्करोगाशी झुंज दिली आहे.

लोकप्रिय अभिनेत्री छवी मित्तल हिने देखील स्तनाच्या कर्करोगाशी सामना केला आहे.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही देखील कॅन्सर सर्व्हायव्हर आहे. तिने कर्करोगाला यशस्वी मात दिली आहे.

महिमा चौधरी हिनेही ब्रेस्ट कॅन्सरचा सामना केला आहे. यात ती विजयी ठरली आहे.

मनीषा कोईराला हिनेही कर्करोगाविरूद्धची लढाई जिंकली आहे. तिला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता.

किरण खेर यांनी देखील ब्लड कॅन्सरचा सामना केला आहे. त्या आजारावर मात करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिनेही ब्रेस्ट कॅन्सरविरुद्धची लढाई जिंकली आहे.

स्वयंपाकासाठी वापरू नका हे तेल

pixabay