दोन दिवसानंतर म्हणजेच १८ जूनला निर्जला एकादशीचे व्रत केले जाणार आहे. पाणी आणि अन्नाचा त्याग करून हे व्रत पाळले जाते.
ज्येष्ठ महिन्यातील गंगा दसऱ्याच्या एक दिवसानंतर निर्जला एकादशी येते. निर्जला एकादशीला लक्ष्मी आणि भगवान विष्णूची भक्तांवर विशेष कृपा बरसते.
ज्योतिषांच्या मते, निर्जला एकादशीला ग्रह-नक्षत्राची चाल ५ राशींसाठी शुभ संकेत देत आहे. या राशींना आर्थिक लाभ होऊ शकतो.
निर्जला एकादशीला मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग सुकर होतील.
मेष
पैशाच्या समस्या संपतील. वैवाहिक जीवनात सुरू असलेले मतभेद दूर होतील. आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल.
निर्जला एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास समाजात तुमचा मान वाढू शकतो. परदेशात नोकरीच्या प्रयत्नात असलेल्यांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते.
वृषभ
पूर्वीपेक्षा आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणांच्या बाबतीत संपूर्ण आठवडा रोमँटिक असू शकतो.
निर्जला एकदाशीला सिंह राशीच्या लोकांची जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. जे लोक सरकारी नोकरी करत आहेत त्यांना परदेशी कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते.
सिंह
नवीन घर खरेदी करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. ज्या लोकांचे नुकतेच लग्न झाले आहे त्यांना धनाचा आशीर्वाद मिळू शकतो. कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.
दनु राशीच्या लोकांसाठी निर्जला एकादशी आनंदाची भेट घेऊन येत आहे. पैसा मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील.
धनु
वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. व्यवसायात पैसा येईल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल.
मीन राशीच्या लोकांना निर्जला एकादशीला सुखाची प्राप्ती होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल.