नववर्ष २०२५ मध्ये या मूलांकाच्या लोकांनी करा महादेवाची पूजा
By
Priyanka Chetan Mali
Dec 31, 2024
Hindustan Times
Marathi
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांक हा कोणत्या ना कोणत्या देवतेशी संबंधित असतो. उदाहरणार्थ, वर्ष २०२५ चा मूलांक ९ आहे आणि त्याचा स्वामी मंगळ आहे.
अशा परिस्थितीत, ज्योतिषी काही राशीच्या लोकांना २०२५ मध्ये भगवान शंकराची पूजा करण्याचा सल्ला देतात.या मूलांकाबद्दल जाणून घेऊया.
यातला एक मूलांक २ आहे. या लोकांची जन्मतारीख २,११,२० आणि २९ असते.
ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ मध्ये भगवान भोलेनाथाची पूजा करणे विशेषत: मूलांक २ च्या लोकांसाठी यशाचे कारण ठरेल.
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६,१५ आणि २४ तारखेला होतो, त्यांचा मूलांक ६ असतो.
२०२५ मध्ये, मूलांक ६ च्या लोकांसाठी देखील भगवान शंकराची उपासना यश मिळवून देईल.
मूलांक ७ ची जन्मतारीख ७,१६ आणि २५ आहेत. त्यांचा स्वामी केतू आहे. २०२५ हे वर्ष त्यांच्यासाठी अनेक बाबतीत शुभ ठरणार आहे.
या मूलांकाच्या लोकांनाही २०२५ मध्ये भगवान शंकराची पूजा करण्याचा सल्ला दिला आहे.
२०२५ मध्ये मूलांक ८ च्या लोकांसाठी देखील भगवान शंकराची पूजा यशस्वी होईल. त्याचवेळी बुधवार, शुक्रवार अणि शनिवीर विशेषत: फायदेशीर ठरतील.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
अमेरिकेत राष्ट्रपती रिटायर झाल्यावर काय काय सुविधा मिळतात ?
पुढील स्टोरी क्लिक करा