स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाचा चवीसोबतच आरोग्यावरही परिणाम होतो.
pixa bay
बाजारात विविध प्रकारचे कुकिंग ऑइल उपलब्ध आहेत. ते सर्वच आरोग्यासाठी चांगले असल्याचे म्हटले जाते. पण ते सत्य नाही.
pixabay
चुकीचे कुकिंग ऑइल वापरल्यामुळे लठ्ठपणा, हृदयाच्या समस्या, पचनाच्या समस्या, सांधेदुधी यासह विविध समस्या उद्भवू शकतात. जाणून घ्या असे कुकिंग ऑइल जे आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करतात.
pixabay
पाम तेलामध्ये ५० टक्के सॅच्युरेटेड फॅट असते. हे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते. याच्या उच्च पातळीमुळे, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ लागतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
pixabay
सोयाबीन तेलामध्ये ओमेगा ६ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. या तेलाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने सांधेदुखी आणि सूज येण्याचा धोका वाढू शकतो.
pixabay
व्हेजिटेबल ऑइल कॉर्न, सूर्यफूल आणि सोयाबीनच्या मिश्रणातून बनवलेले असते. यात ओमेगा ६ फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरात जळजळ होते. या तेलाचे जास्त सेवन केल्याने हृदयात अडथळा निर्माण होऊ शकतो.
pixabay
कॉटन सीड ऑइलमध्ये ओमेगा ६ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने सूज, एलर्जी, त्वचेवर पुरळ उठणे, खाज येणे, डोळ्यांची जळजळ किंवा श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या उद्भवते.
pixabay
ऑलिव्ह ऑइल त्याच्या फायद्यांसाठी लोकप्रिय आहे. ऑलिव्ह ऑइलचा वापर ड्रेसिंग किंवा डिप्ससाठी केला जाऊ शकतो. हे तेल जास्त उष्णतेवर शिजवले तर जुलाबाची समस्याच नाही तर त्वचेवर मुरुम आणि लाल पुरळ देखील होऊ शकतात. ऑलिव्ह ऑइलचा वापर स्वयंपाकासाठी करू नये.
pixabay
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान