नीम करोली बाबांचे गुरूमंत्र

By Rohit Bibhishan Jetnavare
Feb 05, 2024

Hindustan Times
Marathi

नीम करोली बाबांनी श्रीमंतीची गुरुकिल्ली सांगितली आहे. अनेकांना वाटतं आपल्याकडे भरपूर पैसा असावा.  

मग नीम करोली बाबांनी दोन गुरूमंत्र सांगितले आहे. ते उपाय करा आणि श्रीमंत व्हा.

नीम करोली बाबा सांगतात, की ज्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे, त्याला श्रीमंत म्हणता येणार नाही. 

खरा श्रीमंत तो व्यक्ती असतो जो पैशांची खरी किंमत जाणतो आणि उपयुक्तता नीट समजतो. 

जो व्यक्ती पैशांचा योग्य वापर करतो तोच खरा श्रीमंत असतो. पैशांचा वापर नेहमी गरजवंतांसाठी केला पाहिजे.

नीम करोली बाबांच्या मते, पैशांचे आणि वस्तूंचे नेहमी गरजू लोकांना दान केले पाहिजे. 

दुसरा गुरुमंत्र आहे, पैसा त्याच व्यक्ती जवळ येतो, जो व्यक्ती तो खर्च करतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही पैसा साठवून ठेवत असाल तर तुमच्याकडे पैसा येणार नाही. 

सोप्या भाषेत, तुम्ही जेवढा पैसा वाचविण्याचा प्रयत्न कराल तेवढा तो रोज या ना त्या कारणाने खर्च होत जाईल. 

त्यामुळे नीम करोली बाबा म्हणतात, जर तिजोरी रिकामी नसेल तर भरणार कशी.

 गरजूंसाठी खर्च करा, देवाच्या कृपेने तुम्हाला काहीच कमी पडणार नाही

नम्रता मल्लाने बिकिनीमध्ये केला अप्रतिम डान्स, चाहत्यांचे थेट हार्ट बीट वाढले!