चैत्र नवरात्री का साजरी केली जाते? वाचा...

By Harshada Bhirvandekar
Apr 01, 2024

Hindustan Times
Marathi

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून चैत्र नवरात्रीचे व्रत सुरू होते. यंदा चैत्र नवरात्री ९ एप्रिलपासून सुरू होत आहे.

चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चैत्र शुक्ल नवमीपर्यंत माता शैलपुत्री ते माता सिद्धदात्रीची पूजा केली जाते. 

नवदुर्गेची पूजा केल्याने व्यक्तीला नऊ वरदान किंवा आशीर्वाद देखील मिळतात. चला जाणून घेऊया चैत्र नवरात्री का साजरी केली जाते?

पौराणिक कथेनुसार एकदा रंभासुराचा पुत्र महिषासुराने भगवान ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि अमरत्वाचे वरदान मागितले. 

मात्र, ब्रह्मदेव म्हणाले की, जो जन्माला येईल त्याचा मृत्यू निश्चित आहे. तू अमरत्व सोडून काहीही मागू शकतोस.

खूप विचार केल्यावर महिषासुराने म्हटले की, माझा मृत्यू केवळ एका स्त्रीच्या हाताने होऊ शकतो असे वरदान द्या.

वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने तिन्ही जगाचा ताबा घेतला. देव, देवी, मानव सगळे त्याच्यावर नाराज झाले होते.

तेव्हा सर्व देवांनी आदिशक्ती माता जगदंबेचे आवाहन केले. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला ती प्रकट झाली. 

प्रतिपदेपासून नवमीपर्यंत तिने एक एक करून आपली नऊ रूपे प्रकट केली. म्हणून चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात नवदुर्गेची पूजा केली जाते.

केसांसाठी टरबूजच्या बियांच्या तेलाचे फायदे