तुम्ही पण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी देवदर्शनाला निघाले असाल तर या प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या.
राजस्थानातील खाटुशाम - सीकर राजस्थान येथे स्थित प्राचीन खाटूशामच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात. नववर्षाच्या स्वागतासाठी इथे दरवर्षी भाविकांची गर्दी होते.
अयोध्या श्रीराम मंदिर - अयोध्या आता पर्यटकांची पहिली पसंती बनली आहे. वर्ष २०२४ हे रामनगरी अयोध्येसाठी सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार ठरले.
सिद्धिविनायक - नववर्षात स्वप्न, इच्छापूर्ती व्हावी असे साकडे घालण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनालाही भाविक गर्दी करतात.
यंदा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेत पहाटे ३ पासून मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.
साईबाबा - वीन वर्षानिमित्ताने साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे ३१ डिसेंबर रोजी रात्रभर उघडे ठेवण्यात येणार आहे.
यावर्षी ९० पायी पालख्या येणार असून, रात्री १० वाजताची शेजारती आणि १ जानेवारी रोजी पहाटेची ५.१५ वाजताची काकड आरती होणार नाही.
सप्तश्रृंगी मंदिर - नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरातही दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची गर्दी होते.
यामुळे मंदिर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार देवीचे मंदिर रविवार २९ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत २४ तास खुले राहणार आहे.