डेव्हिड व्हिसे निवृत्त

By Rohit Bibhishan Jetnavare
Jun 16, 2024

Hindustan Times
Marathi

टी-20 विश्वचषक २०२४ मधील नामिबियाचा प्रवास संपला आहे. त्यांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने ४१ धावांनी पराभूत केले.

नामिबियाने ग्रुप फेरीत ४ सामने खेळले आणि केवळ एकच सामना जिंकला. यामुळे नामिबियाचा सुपर-8 मध्ये पोहोचू शकला नाही.

सामन्यानंतर नामिबियाचा स्टार खेळाडू डेव्हिड विसे याने निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.

आपल्या करिअरच्या शेवटच्या सामन्यात डेव्हिड वीसाने १२ चेंडूत २७ धावा केल्या, त्याने २ चौकार आणि २ षटकार ठोकले. 

मॅचविनर डेव्हिड वीसाने १५ वनडे ३३० धावा केल्या. T20I मध्ये त्याने ४० डावात ६२४ धावा आणि ५९ विकेट्स घेतल्या. 

नामिबियाआधी डेव्हिड वीसाने दक्षिण आफ्रिकेकडूनही क्रिकेट खेळला आहे.

३९ वर्षीय डेव्हिड वीसाने IPL मध्ये RCB, KKR चे प्रतिनिधित्व केले आहे. IPL मध्ये त्याने १५ सामन्यात १६ विकेट आणि १२७ धावा केल्या.

डेव्हिड विसाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो जगभरातील क्रिकेट लीगमध्ये खेळत राहील.

दुबईच्या राजकुमारीचे आरस्पानी सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

Instagram