नवरात्रीच्या नऊ दिवसांत अवश्य करा ‘ही’ ६ कामं!

By Harshada Bhirvandekar
Oct 03, 2024

Hindustan Times
Marathi

शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. हे नऊ दिवस देवीच्या उपासनेसाठी शुभ मानले जातात.

नवरात्रीत देवी आईचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही कामे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया...

नवरात्रीत पहिल्या दिवशी अखंड ज्योत प्रज्वलित करावी आणि संपूर्ण ९ दिवस ही ज्योत तेवत ठेवावी.

नवरात्रीत शुभ मुहूर्तावर कलश स्थापन करून, गहू पेरण्याला अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.

नवरात्रीत देवी आईचा विशेष शृंगार करावा. तसेच देवीला शृंगाराचे समान अर्पण करावे.

नवरात्रीच्या दिवसांत आपल्या क्षमतेनुसार उपवास आणि व्रत करावे.

कन्या पूजनाशिवाय नवरात्रीचे व्रत अपूर्ण आहे. अष्टमी अथवा नवमीला कन्या पूजन अवश्य करावे.

नवरात्रीच्या नऊ दिवस देवीच्या देवळात जाऊन देवीचे दर्शन घ्यावे.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान