मोटो जी३५ 5G लॉन्च, १० हजारांत दमदार फीचर्स!
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 11, 2024
Hindustan Times
Marathi
मोटोरोलाने भारतात मोटो जी ३५ 5G हा नवीन जनरेशनचा जी-सीरिज स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
हा स्मार्टफोन काही लक्षवेधी फिचर्ससह येतो, जे बजेट स्मार्टफोन बाजारात लक्ष वेधून घेऊ शकतात.
मोटो जी ३५ 5G मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १००० निट्स पर्यंत पीक ब्राइटनेससह ६.७२ इंचाचा फुल-एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे.
मोटो जी ३५ ५ जी मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ५० एमपी क्वाड पिक्सल मेन कॅमेरा आणि ८ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आहे.
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी २० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हा फोन रेड, लीफ ग्रीन आणि मिडनाइट ब्लॅक या तीन रंगात बाजारात दाखल होणार आहे.
हा फोनच्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे.
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा