बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री खऱ्या आयुष्यात बनल्या सावत्र आई!

By Harshada Bhirvandekar
May 10, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी एखाद्या अभिनेत्याशी दुसरे लग्न केले आणि त्यांच्या मुलांच्या सावत्र आई झाल्या. पण, त्यांनी या सावत्र मुलांवरही पोटच्या बाळांप्रमाणे प्रेम केले.  

हेमामालिनी यांनी धर्मेंद्र सोबत दुसरे लग्न केले आणि त्या सनी आणि बॉबी देओल यांच्या सावत्र आई झाल्या.

करीना कपूर-खान ही सारा अली खान आणि इब्राहिम खान यांची सावत्र आई आहे. पण, त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते आहे.  

अभिनेत्री दिया मिर्झाने बिझनेसमन वैभव रेखीसोबत दुसरे लग्न केले. दिया त्याची मुलगी समयरासोबत मैत्रीचं नातं जपते. 

अभिनेत्री सोनी राजदान ही पूजा भट्टची सावत्र आई आहे. पण, त्यांच्यात कधीच कोणतेच वाद झाले नाही. त्या नेहमी एकत्र प्रेमाने राहिल्या.  

शबाना आजमी या जोया आणि फरान अख्तर यांच्या सावत्र आई आहेत. अनेक खास प्रसंगी हे कुटुंब धमाल करताना दिसतं.  

सलमान खानची सावत्र आई हेलन त्याच्यासोबत एकाच घरात राहते. सलीम खान यांनी दोन लग्न केली होती. त्यांच्या दोन्ही पत्नी एकत्र कुटुंबात राहतात.  

मान्यता दत्तने संजय दत्त सोबत लग्नगाठ बांधली होती. तर, संजय दत्त च्या पहिल्या बायकोची मुलगी त्रिशाला आणि मान्यता यांच्यात छान नातं आहे.  

किरण रावने आमिर खानशी लग्नगाठ बांधली तेव्हा आमिरला आयरा आणि जुनैद अशी दोन मुलं होती. या दोघांबरोबरही किरणच फार छान नातं आहे.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay