मोक्षदा एकादशीला काय करावे आणि काय करू नये

By Priyanka Chetan Mali
Dec 10, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात मोक्षदा एकादशीला शुभ फळ देणारे मानले जाते, मान्यतेनुसार या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश दिला होता.

या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. भगवान श्रीहरिची मनोभावे पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो.

जाणून घेऊया मोक्षदा एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये.

मोक्षदा एकादशीला सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालून भगवान विष्णूची पूजा करावी.

मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळ्या रंगाची फूले अर्पण करा.

मोक्षदा एकादशीला दान-धर्म करने फळदायी मानले जाते, यामुळे या दिवशी दान नक्की करा.

एकादशीला भात खाऊ नये, तसेच या दिवशी केसं आणि नखेही कापू नये.

एकादशीच्या दिवशी घरात वाद-विवाद टाळा, बोलताना अपशब्द वापरू नका रागावर नियंत्रण ठेवा.

डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

बॉलिवूड अभिनेत्रींच्या ट्रेंडी ब्लाऊज डिझाईन्स! 

Instagram