मोहिनी एकादशीला हे उपाय करा

By Rohit Bibhishan Jetnavare
May 18, 2024

Hindustan Times
Marathi

एकादशीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. 

पंचांगानुसार, एकादशी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या अकराव्या तिथीला येते. 

पण वैशाख महिन्यातील शुक्ल महिन्यात येणाऱ्या एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे.

या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. कारण वैशाख शुक्ल एकादशीला भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला होता.

यावर्षी मोहिनी एकादशीचे व्रत आणि पूजा १९ मे २०२४ रोजी केली जाणार आहे.

एकादशीच्या दिवसाशी संबंधित नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वांनी एकादशीचे व्रत करून या नियमांचे पालन करावे. तरच व्रत यशस्वी आणि पूर्ण होते.

या व्रतामुळे मनुष्याला भगवान श्री हरींचा आशीर्वाद प्राप्त होतो. मोहिनी एकादशीच्या दिवशी काय करावे, ते जाणून घेऊया.

मोहिनी एकादशीच्या दिवशी श्री हरीच्या मोहिनी अवताराची पूजा करावी. तसेच देवाला चंदनाचा तिलक लावावा, जव आणि तुळशीची पाने अर्पण करावीत.

मोहिनी एकादशीचे व्रत करणाऱ्या लोकांनी दशमी तिथीच्या आदल्या दिवसापासून सात्विक राहावे आणि सात्विक भोजन करावे.

एकादशीचे व्रत ठेवावे व गाईची सेवा करावी. त्यांना हिरवा चारा द्यावा.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान