डेनमार्कची व्हिक्टोरिया ठरली मिस युनिव्हर्स २०२४, तिचे शिक्षण किती?

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Nov 18, 2024

Hindustan Times
Marathi

डेनमार्कची २१ वर्षीय व्हिक्टोरिया केजर थेलविग १२६ देशांच्या सौंदर्यवतींना मागे टाकत २०२४ ची  Miss Universe ठरली आहे.

 व्हिक्टोरिया केजर थेलविग डेनमार्कची पहिलीच तरुणी आहे, जिने हा किताब जिंकला आहे. 

व्हिक्टोरियाचा जन्म डेनमार्कमधील सोबोर्ग, ग्रिब्सकोव मध्ये २००४ मध्ये झाला होता.

व्हिक्टोरियाने आपल्या नैसर्गिक सौंदर्याने प्रेक्षकांना मोहित केले, तसेच तिने महिलांचे अधिकार व शिक्षणाबाबत आपली मते मांडली.

 व्हिक्टोरिया  एक डेनिश एंटरप्रन्योर आणि व्यावसायिक डान्सर आहे. 

 व्हिक्टोरिया केजर हिने बिझनेस व मार्केटिंगमध्ये पदवी घेतली आहे. 

तिला आता वकील बनायचे आहे. त्याचबरोबर ती मेंटल हेल्थ आणि पशू संरक्षणाच्या बाजुने मते मांडते.

२०२२ मध्ये  व्हिक्टोरियाने मिस ग्रँड इंटरनशनलच्या टॉप २० मध्ये स्थान पटकावून आपली ओळख  मिळवून दिली.

सप्टेंबर २०२४ मध्ये व्हिक्टोरिया केजरने मिस युनिव्हर्स डेनमार्क २०२४ चा मुकूट पटकावला.

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?