‘मिर्झापूर ३’ या वेब सीरिजमध्ये अभिनेता अली फजलने पुन्हा एकदा गुड्डू पंडितच्या भूमिकेतून खळबळ उडवून दिली आहे.
अली फजल याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा अभिनय लोकांना खूप आवडतो. मिर्झापूरच्या तीनही सीजनमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली आहे.
अभिनयाच्या जगात नाव कमावणारा अली फजल अभ्यासातही हुशार आहे. तो कितवी शिकलाय, जाणून घेऊया...
अली फजलचा जन्म १५ ऑक्टोबर १९८६ रोजी लखनऊमध्ये झाला. अलीने आपले सुरुवातीचे शिक्षण लखनऊच्या मार्टिनियर कॉलेज मधून केले. त्यानंतर त्याने डेहरादूनमधील ऑल बॉईज बोर्डिंग स्कूलमध्ये पुढचे शिक्षण घेतले.
अलीने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. इथूनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली.
अली फजलने भारतीय अमेरिकन चित्रपट ‘द अदर एंड ऑफ द लाईन’मधून पदार्पण केले.
आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातून त्याने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. यामध्ये त्याची छोटीशी भूमिका होती.
‘फुकरे’, ‘सोनाली केबल’, ‘हॅपी भाग जायेगी’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच अलीने ‘फ्युरियस ७’ आणि ‘डेट ऑफ द नाईट’ यांसारख्या इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले.
अली फजलने ‘फुकरे’ चित्रपटातील सहकलाकार रिचा चढ्ढा हिच्यासोबत लग्न केले आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान