खासदार प्रियंका गांधी यांच्या मुलांना पाहिलं का ?
By
Ninad Vijayrao Deshmukh
Dec 18, 2024
Hindustan Times
Marathi
केरळच्या वायनाड येथील नवनियुक्त खासदार प्रियंका गांधी यांचं लग्न झालं असून त्यांना दोन मुलं आहेत. प्रियंका गांधी यांच्या पतीचे नाव रॉबट वाड्रा आहे.
प्रियंका गांधी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव मीराया आहे तर मुलाचे नाव रेहान आहे. रेहान हा मीराया हिच्या पेक्षा एका वर्षांनी मोठा आहे.
रेहान आणि मिराया हे दोघेही राजकारणापासून आणि प्रसिद्धीपासून दूर राहतात. दोघेही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.
प्रियंका यांचा मुलगा रेहान यांना फोटोग्राफीचा छंद आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याची झलक दिसते.
रेहान प्रामुख्याने वाइल्ड लाईफ आणि व्यावसायिक फोटोग्राफी करतात. या सोबतच रेहान हे क्रीडापटू असून त्यांना शूटिंग हा खेळ आवडतो.
प्रियंका गांधी यांची मुलगी मिराया हिला बास्केटबॉल खेळणे आवडते. ती विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असते.
मियारा व आई प्रियंका गांधी या कधी कधीच सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यक्रमात एकत्र दिसतात.
रेहान हा सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टिव असतो तर मिराया ही फार कमी सोशल मीडिया वापरते.
राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या प्रमाणे रेहान व मिराया हे दोघे राजकारणात प्रवेश करणार का ? हे वेळचं ठरवणार आहे.
दोघांनी डेहराडून येथून शिक्षण घेतले आहे. रेहानने डेहराडून येथील एका शाळेतून तर मिराया हिने वेलहम गर्ल्स स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आहे.
अॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध
Pexels
पुढील स्टोरी क्लिक करा