उन्हामुळे शरीरात समस्या निर्माण होतात. शरीरात उष्णताही वाढते. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही टरबूज खाऊ शकता.
pixabay
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे. शरीरात पाणी कमी असल्यास डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात टरबूज शरीरातील हायड्रेशन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्ही त्यांच्या बिया देखील वापरू शकता.
pixabay
टरबूजच्या बियांचा चहा प्यायल्याने मधुमेह नियंत्रित करण्यात आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात मदत होते. टरबूजच्या काही बिया बारीक करा आणि एक लिटर पाण्यात १५ मिनिटे उकळवा. हे तीन दिवस घ्या आणि एक दिवस ब्रेक द्या. याची पुनरावृत्ती करा.
pixabay
निरोगी हृदय हवे असेल तर टरबूजाच्या बिया उकळवून त्याचे पाणी नियमित प्या. हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
pixabay
टरबूजाच्या बियांमधील मॅग्नेशियम हृदयाचे संरक्षण करते. हृदयाच्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे.
pixabay
टरबूजच्या बिया सुंदर, मजबूत केस देते. याचे उकळलेले पाणी प्यायल्याने केसांचे नुकसान आणि टाळूची खाज सुटू शकते. टरबूजाच्या बियांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रिंकल फ्री स्किन देते. टरबूजच्या बिया उकळलेले पाणी किंवा चहा प्यायल्याने तुमची त्वचा चमकदार होते.
pixabay
ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी टरबूजच्या बिया उत्तम आहे. टरबूजच्या बियांमध्ये आर्जिनिन असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. हे रक्तवाहिन्या आकुंचन होण्यापासून प्रतिबंधित करते.
pixabay
टरबूजाच्या बियांमध्ये अत्यावश्यक अमीनो ॲसिड असते. हे चयापचय वाढवते. हाडे आणि ऊतक मजबूत करते.
pixabay
टरबूजच्या बियांमध्ये व्हिटॅमिन बी, नियासिन, फोलेट, व्हिटॅमिन बी६ यासह अनेक पोषक घटक असतात. नियासिन मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी चांगले आहे. यात असलेल्या अनेक प्रकारचे पोषक आणि जीवनसत्त्वांमुळे प्रतिकारशक्ती वाढते.