मौनी अमावस्येला या तेलाचा दिवा लावा, मिळेल शुभ परिणाम
By
Priyanka Chetan Mali
Jan 29, 2025
Hindustan Times
Marathi
पौष महिन्याच्या अमावस्या तिथीला मौनी अमावस्या म्हणतात. या वर्षी २९ जानेवारी २०२५ रोजी मौनी अमावस्या आहे.
असे मानले जाते की, अमावस्येला पितर पृथ्वीवर येतात. त्यामुळे पितरांच्या नावाने दिवा लावावा.
मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांचे तर्पण, दान, श्राद्ध करण्यासह दिवा लावण्याचेही महत्व आहे.
पितरांसाठी दिवा लावताना काही नियम आहे. जाणून घेऊया हा दिवा कसा आणि केव्हा लावला पाहिजे.
मान्यतेनुसार, पितरांच्या मार्गात अंधार नसावा, यामुळे दिवा लावला जातो. यामुळे प्रसन्न होऊन पितर आशीर्वाद देतात.
पितरांना प्रस्न करायचे असेल तर सूर्यास्त होण्याच्या काही वेळ आधीच दिवा लावला पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या मार्गात अंधार नसेल.
असे सांगितले जाते की, पिंपळाच्या झाडाजवळ किंवा दक्षिण दिशेला दिवा लावा.
मातीच्या दिव्यात मोहरीचे तेल टाकून आणि कापसाची वात लावून दिवा पेटवा.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा