मार्गशीर्ष पौर्णिमेला या गोष्टींचे दान ठरते लाभदायक

By Priyanka Chetan Mali
Dec 12, 2024

Hindustan Times
Marathi

मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्ट्या पवित्र मानला गेला आहे. 

या महिन्याच्या पौर्णिमा तिथीला केलेल्या धार्मिक कार्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात.

मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा तिथी १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी प्रारंभ होत असून, दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ३१ मिनिटांनी समाप्त होईल.

उदया तिथीनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा १५ डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. या दिवशी गंगा स्नानासह दान करणेही शुभ मानले जाते.

मार्गशीर्ष पौर्णिमेला काही वस्तूंचे दान महत्वाचे आहे, जाणून घेऊया याबद्दल

मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्न दान करणे शुभ मानले जाते.

मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्न दान केल्याने घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही.

मार्गशीर्ष पौर्णिमेला शंख दान केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.

मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्राची पूजाही केली जाते. यादिवशी चांदीचा शिक्काही दान करू शकतात.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

भोजपुरी अभिनेत्रीच्या रेड रिवीलिंग ड्रेसमध्ये मादक अदा