साडीत दिसतेय खास;  श्रेया बुगडेचा पारंपारिक साज!

By Harshada Bhirvandekar
Sep 11, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आणि लाफ्टर क्वीन म्हणजे श्रेया बुगडे.

श्रेया बुगडे नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. 

अभिनयासोबतच श्रेया बुगडे सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. 

श्रेया सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

तर, याच माध्यमातून ती नेहमी आपल्या चाहत्यांना आपल्या आयुष्याची एक झलक दाखवत असते. 

सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि सगळ्यांच्याच घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. 

गणपती बाप्पांसोबतच श्रेयाच्या घरी गौराई देखील आल्या आहेत. 

या निमित्ताने श्रेया बुगडे खास पारंपारिक अंदाज तयार होऊन सगळ्यांचे स्वागत करताना दिसली आहे. 

या फोटोंमध्ये श्रेया बुगडेने मोती रंगाची सुंदरशी साडी नेसली असून, नाकात नथ, आंबाडा आणि गजरा असा पारंपारिक साज केला आहे.

मखाना खाण्याचे काय आहेत फायदे?