प्राजक्ता माळीला वाटते लग्नाची भीती!

By Harshada Bhirvandekar
Sep 02, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.

प्राजक्ता नेहमीच आपले सुंदर आणि लक्षवेधी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

यशाच्या शिखरावर असताना प्राजक्ता माळी आता लग्न कधी करणार असा प्रश्न नेहमीच तिच्या चाहत्यांना पडतो.

प्राजक्ता माळी अद्यापही सिंगल आहे. त्यामुळे हा प्रश्न तिला नेहमीच विचारला जातो.

मात्र, मला लग्नाची आणि कमिटमेंटची भीती वाटते, असे मोठे वक्तव्य प्राजक्ता माळीने केले आहे.

प्राजक्ता आधी २-३ वेळा प्रेमात पडली आहे. मात्र, प्रत्येक वेळी तिच्या पदरी निराशा पडली आहे.

याशिवाय आता लग्नसंस्था ज्याप्रकारे विस्कळीत होतेय, ते बघून मला लग्नाची भीती वाटत असल्याचे ती म्हणाली.

एक कलाकार म्हणून मी मुक्त आहे आणि मला बंधनात अडकायचं नाही, असं प्राजक्ता म्हणाली.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!