मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार त्यांना येणारे वाईट अनुभव वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
मराठमोळी अभिनेत्री अश्विनी कासार हिने देखील तिच्याबरोबर नुकतीच घडलेली एक अतिशय वाईट घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे.
लोकल ट्रेन प्रवासादरम्यान तिला आलेला हा वाईट अनुभव तिने तिच्या अकाउंटवर शेअर केला आहे.
अश्विनी कासारनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अश्विनी कासार मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती नेहमी लोकल ट्रेनने प्रवास करताना दिसते.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी अश्विनी नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकताच अश्विनीने तिच्या अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने एका बाईने आपल्याला लाथ मारल्याचं म्हटलं आहे.
अश्विनी समोर बसलेल्या एका स्त्रीला चपलेचे पाय सीटवर ठेवता येत नसल्याकारणाने तिने थेट अश्विनीला लाथच मारली आहे, असं अभिनेत्रीने तिच्या या व्हिडीओमध्ये म्हटले.
मराठी भाषेत बोलली म्हणून देखील या महिलेने अश्विनी सोबत वाद घालायला सुरुवात केल्याचे देखील ती म्हणाली.
अश्विनीने हा व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलिसांना आणि रेल्वे पोलिसांना देखील टॅग केला आहे. या महिलेवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा देखील अश्विनी व्यक्त केली आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान