'३६ डेज'मध्ये दिसणार अमृता खानविलकरचा हटके अंदाज!

By Harshada Bhirvandekar
Jul 09, 2024

Hindustan Times
Marathi

'३६ डेज' ही वेब सीरिज १२ जुलै रोजी प्रसारित होणार असताना प्रेक्षकांमध्‍ये उत्‍सुकता शिगेला पोहोचली आहे. 

ही सीरिज क्राईम, थ्रिलर, लबाडी, फसवणूक, प्रेम आणि कटकारस्‍थानांच्‍या चक्रव्‍यूहाच्‍या माध्‍यमातून रोलरकोस्‍टर राईडवर घेऊन जाणार आहे. 

यामध्‍ये अधिक उत्‍साहाची बाब म्‍हणजे या आगामी सीरिजमध्‍ये अमृता खानविलकर आणि शरिब हाश्‍मी पहिल्‍यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 

'३६ डेज'मध्‍ये शरिब हाश्‍मीने गोव्‍यामधील हॉटेल एमराल्‍ड ओशियन्‍स स्‍टार सूट्समधील जनरल मॅनेजर विनोद शिंदेची भूमिका साकारली आहे. 

विनोदची भूमिका सामान्‍य घरातील विनम्र सुरूवातीपासून आदरयुक्‍त पद मिळवण्‍यापर्यंत दाखवण्‍यात आली आहे.

तसेच, त्‍याला त्‍याच्‍या वैयक्तिक जीवनात, विशेषत: अमृता खानविलकर हिने साकारलेली भूमिका त्‍याची पत्‍नी ललितासोबत आव्‍हानांचा सामना करावा लागतो. 

दुसरीकडे, ललिता ही गुंतागुंतीची भूमिका आहे, जिचा भूतकाळ गोंधळात टाकणारा आहे.

तसेच, तिचा लक्‍झरी व स्‍टेटस मिळवण्‍याचा निरंतर प्रयत्‍न तिला नैतिकदृष्‍ट्या संदिग्‍ध स्थितीत आणतो.

प्रेक्षकांना या सीरिजमध्‍ये अमृता आणि शरिबची केमिस्‍ट्री आणि भावनिकता पाहताना प्रेक्षकांनाही धमाल येणार आहे.

All Photos: Instagram

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान