बारावीत ‘या’ विषयात नापास झालेला सुबोध भावे!

By Harshada Bhirvandekar
May 05, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळा अभिनेता सुबोध भावे मालिका, चित्रपट, वेबसीरिज, नाटक या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

आपल्या अभिनयाच्या जोरावर सुबोधने सिनेसृष्टीत स्वतःच असं स्थान निर्माण केलं आहे. 

अभिनेता सुबोध भावे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. 

भला मोठा चाहता वर्ग असणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत सुबोधचं नाव आवर्जून घेतलं जातं. 

अलीकडेच सुबोध भावे त्यांच्या ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटामुळे चर्चेत आला होता.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटालाही सुबोधने आवाज दिला.

सुबोध सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काहीना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.

आता अभिनेता सुबोध भावे यांने तो इयत्ता १२वीच्या परीक्षेत ‘फिजिक्स’ या विषयात नापास झाल्याचा खुलासा केला.

फिजिक्समध्ये नापास होणारा आज फिजिक्स शिक्षकाची भूमिका करतोय, अशी पोस्ट त्याने केली होती.

साठी पार केलेल्या लोकांनी या गोष्टींची घ्यावी काळजी