मानसी नाईकच्या ‘नाकात नथ’ अन् नखरेल अदा!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Oct 02, 2024

Hindustan Times
Marathi

गेल्या वर्षी नथीचा नखरा ही थीम विशेष चर्चेत राहिली, यानंतर आता पुन्हा नाकातील नथीची भुरळ घालायला मानसी सज्ज झाली आहे.

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या ‘नाकात नथ’ या गाण्याने प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवला आहे. 

साऱ्यांना भुरळ घालणाऱ्या या गाण्यातून एक नवी कोरी जोडीही त्यांचा नखरा दाखवताना दिसत आहे. 

ही जोडी म्हणजे अभिनेत्री मानसी नाईक आणि अभिनेता आदित्य घरत.

या बेधुंद आणि धमाकेदार गाण्यातून मानसी नाईकचा नखरेल अंदाज विशेष भावतोय. 

यापूर्वीच्या आलेल्या मानसी नाईक हिच्या सर्वच गाण्यांनी रसिकांना थिरकायला भाग पाडलं. 

आता तिचं हे नवंकोरं मराठमोळं ‘नाकात नथ’ हे गाणं साऱ्यांच्या दिलावर राज्य करतंय.

गायक रोहित राऊत व गायिका सोनाली सोनावणे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात हे गाणे स्वरबद्ध केले आहे.

मानसी व आदित्य यांचा नखरेल स्वॅग असलेलं हे ‘नाकात नथ’ गाणं साऱ्यांना ठेका धरायला लावतंय.

पचास तोला! श्रेया बुगडेच्या लूकवर भन्नाट प्रतिक्रिया